Sunday, January 31, 2010

डोळे

डोळे
काळोखाला हळूहळू
चटावतात डोळे
सरावत जातात
पाण्यालाही मग कावळे
अंकुरही वळवळतात
चार सडाके पडले की
नजरांना चटक
लागते काळोखाची
गात्रांना मात्र ओढ
प्रखर उजेडाची
बिलगतात देह
काळोखात घट्ट
चालू असते केवळ
डोळ्यांची उघडमीट

1 comment:

prakashkshirsagar said...

वाचक मित्र मैत्रिणींनो, नमस्कार २०१० या वर्षातील ही आपली पहिलीच भेट या कवितांवर व जुन्या कवितांवरही प्रतिक्रिया नोंदवा.