Monday, July 18, 2011

prakashkshirsagar: नादान माणसेही

prakashkshirsagar: नादान माणसेही

नादान माणसेही

गावात श्‍वापदे ही राहावयास आली
का मानवा खुपावी झाडे बहरास आली?
घेतात ते सुपारी लोकांस मारण्याची
ही माणसे कुणाची जपण्या तयांस आली
विश्‍वास का नसावा अपुल्याच माणसांचा
हेरास नेमण्याची पाळी कशास आली
तारा अशा जुळाव्या गंधार छेडल्यावर
हुक्कीच अडण्याची साऱ्या सुरास आली
कुंडीत लावलेल्या रोपांस वाढ नाही
बागेतल्या कळीच्या जिवास आली
रमतो फुलांत सागर आता कशास येथे
गंधात परी कळीच्या गुंगी भुंग्यास आली

-----------------------------
घेऊन फूल आली मृत्यूस भेटण्याला
----------------------------------------
माझ्याच भोवताली सैतान माणसेही
देतात त्रास सर्वां नादान माणसेही
नसतो कुणास येथे कसलाच धाक आता
जाणून सर्व काही बेभान माणसेही
फुगतो नवीन रस्ता बेताल वाहनांनी
धुंदीत धावताना बेजान माणसेही
नाकासमोर माझे हे चालणे असूनी
छळतात का मला मग बैमान माणसेही
वागणे तुझे मनस्वी कळणार काय सागर
होती मुजोर सारी अज्ञान माणसेही
--------------- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, ताळगाव, गोवा