Sunday, August 1, 2010

आषाढ आला

आषाढ आला घन दुरून आले
तव आठवाने मन भरून आले
आषाढ पहिला छळतो असा हा
नयन हे माझे विरहात ओले
सजन कसा तो ठावूक नाही
रूप तयाचे गात्रांत भरले
स्पर्श तयाचा उल्हास भरतो
सौभाग्य लेणे हर्षात न्हाले
आषाढ सरींचे बेफाम जगणे
नव उन्मेष ऐसे कोंबात हसले
आषाढ येतो सजतो रमतो
संगीत सजते धरणी डोले
आता कुठेती आषाढ गाणी
छंद उरीचे उरात उरले

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर