Friday, February 20, 2009

mazee may

माय कोणाचीही असो

माय कोणाचीही असो
तिला फक्त कळते माया
ममतेचे आवरण तिच्या
काळजाच्या येती ठाया
मायचे चित्त पिल्लांवर
त्यांच्याच रक्षणावर
कोणी काही बोलताच
धावून येते अंगावर
माय मग ती कोणाचीही
माणसाची, पाखरांची
किंवा असूद्या पशूंची
तिची भाषा ही प्रेमाची
स्वतः कष्ट सोसते नि
मुलांना खूप जपते
माय ही मायच असते
नजरेत सौहार्द वसते
दुरूनच तिची जरब
असते पिल्लांवरती
त्यांची तर तिला असे
खूप काळजी दिसराती
आपण खाते खस्ता
सोसते आजारपण
तिच्या नजेरची माया
देते पिल्लाला सोशिकपण
किती आरामात असतो
आपण कुठेही रानावनात
तिचा धाक दुःखालाही
राखणाची करतो बात
तिचे आशीर्वाद येतात
प्रत्येक वेळी कामाला
तिच्या त्यागाची, कष्टाची
किंमत कुठे आम्हाला
नका करू दोस्तहो
बेईमानी तिच्याशी
आपल्यासाठीच तिची
आयुष्याची कसोशी

prakash kshirsagar