Thursday, October 15, 2009

शुभेच्छा!

शुभेच्छा!
दीपांतूनी उजळत येते आयुष्य अशी दीपावली
आनंदाचे दीप लावते आयुष्यात ही दीपावली
मनामनातील तमा घालवी अशी ही दीपावली
तनातनातून जोम जागवी अशी ही दीपावली

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

-------------------------

दिव्यांचा उत्सव मनात सजला
भाव उजळला अंतरीचा
अंतरीचे रंग आकाशात गेले
तारकांचे झेले बनुनिया

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

शुभेच्छा!

दीपांतूनी उजळत येते आयुष्य अशी दीपावली
आनंदाचे दीप लावते आयुष्यात ही दीपावली
मनामनातील तमा घालवी अशी ही दीपावली
तनातनातून जोम जागवी अशी ही दीपावली

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

-------------------------

दिव्यांचा उत्सव मनात सजला
भाव उजळला अंतरीचा
अंतरीचे रंग आकाशात गेले
तारकांचे झेले बनुनिया

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीय
गोवा.

Saturday, October 3, 2009

सारे साव झाले ।

कालचे जे चोर होते तेच सारे साव झाले ।
वाढला अन्‌ भाव मग तेच सगळे साव झाले ।।१।।
वाहिलेल्या त्या फुलांचे ईशचरणी पुण्य झाले
भावनेचा हाट झाला मंदिरीया भक्तिचे भाव झाले २।।
भक्त झाले देव आता देवळाला देव मुकले
चालला हा व्यवहार इथे तरी त्यांचे नाव झाले ।।३।.
पीक नाही घेत कोणी बीज कणगीत पडले असे
बंगले सारेच येथे रानआता गाव झाले ।।४।।
सागर किनारी करित चिंता कुणाच्या भाकिताची
बन सुरूचे सुन्न होते त्यास चिंता काय झाले ।।५।।
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Sunday, September 27, 2009

हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

फूल होता त्या कळीचे मंद वारा वाहतो का
आणि फूल होते तेव्हा तो तिला टाळतो का?

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Monday, September 14, 2009

बालकविता

१)
खारुताई
झाडावरून खारुताई
खिडकीत बसली
राघवने मग तिला
थोडी भाकरी दिली
खारुताई आनंदाने
नाचू गाऊ लागली
कावळ्याने ते पाहून
तेथे झेप घेतली
खारुताईची भाकरी
कावळ्याने पळविली
राघवची स्वारी मग
उग्गी रुसून बसली

-प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Saturday, August 22, 2009

शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर व परिवार

-------------
हायकू
रानातले फूल
शहरात आले
प्रदूषणाने मेले

अजून मोगरी
फुलाविना कशी
झाडे झाली पिशी

कळ्यांचा बहर
खोडात रुतला
मुळांना काचला
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Saturday, July 25, 2009

श्रावण आला

श्रावण आला
अंबरातले निळे झरे
उतरुनी भूमिवरी आले
रम्य मनोहर सजलेले
डोंगरातले नदी - नाले
काठवरच्या तरू लतांना
छेडित कशा या जलधारा
आला श्रावण श्रावण आला
संगे घेऊन सणांची माला

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Sunday, July 5, 2009

उरात तराणे

उरात तराणे

कावळ्यांची हूल
पाऊस चाहूल
परी झाले गुल
पाणी कसे?
कसे भोवताली
शिशिराचे गाणे
उरात तराणे
गात कोणी
कोणी आठवावी
विहिरीची खोली
पाण्याने भरलेली
कदाकाळी


वारा
त्या कळीचे फूल होता
मंद वारा वाहतो
अन्‌ फूल झाल्यावरी
तो तिला का टाळतो
गंधवेणा साहताना
हा किनारा ओलावतो
वाळूंनाही तेव्हा का
लाटांचा मोह होतो
ऊर्जा नभाच्या कडेतून
अशी ही प्रवते
कुठे तो सूर्य
प्रसन्न होऊन उगवतो

प्रकाश क्षीरसागर

Friday, February 20, 2009

mazee may

माय कोणाचीही असो

माय कोणाचीही असो
तिला फक्त कळते माया
ममतेचे आवरण तिच्या
काळजाच्या येती ठाया
मायचे चित्त पिल्लांवर
त्यांच्याच रक्षणावर
कोणी काही बोलताच
धावून येते अंगावर
माय मग ती कोणाचीही
माणसाची, पाखरांची
किंवा असूद्या पशूंची
तिची भाषा ही प्रेमाची
स्वतः कष्ट सोसते नि
मुलांना खूप जपते
माय ही मायच असते
नजरेत सौहार्द वसते
दुरूनच तिची जरब
असते पिल्लांवरती
त्यांची तर तिला असे
खूप काळजी दिसराती
आपण खाते खस्ता
सोसते आजारपण
तिच्या नजेरची माया
देते पिल्लाला सोशिकपण
किती आरामात असतो
आपण कुठेही रानावनात
तिचा धाक दुःखालाही
राखणाची करतो बात
तिचे आशीर्वाद येतात
प्रत्येक वेळी कामाला
तिच्या त्यागाची, कष्टाची
किंमत कुठे आम्हाला
नका करू दोस्तहो
बेईमानी तिच्याशी
आपल्यासाठीच तिची
आयुष्याची कसोशी

prakash kshirsagar