Wednesday, June 30, 2010

बेडूक

बेडूक

डराव डूक, ओरडे बेडूक
पावसा पावसा, लवकर ये
नाहीतर तुझ्यावर करीन चेटूक
निळसर नभा, घेऊन ये ढगा
नाहीतर तुझा मऊ मऊ
पळवून नेईन तुझा झगा
रागवाले त्याच्यावर मग
तेव्हा निळे निळे आकाश
पहिल्याच पावसात बेडकाला
जमिनीवर धाडले सावकाश


ससोबा खाशेराव
झाल जंगलचे राव
पाळले वाघ रक्षणास
हत्तीची अंबारी बसण्यास
कोल्होबा घालतात पिंगा
चिऊताईचा भोवती दंगा
लांडगोबाला पाहवली
नाही, ससोबाची ऐट
जाऊन त्याने मग
घेतली वनराजाची भेट
वनराज बाघोबा
खूप खूप संतापले
डरकाळी फोडताच
सगळे धूम पळाले

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर