Saturday, October 3, 2009

सारे साव झाले ।

कालचे जे चोर होते तेच सारे साव झाले ।
वाढला अन्‌ भाव मग तेच सगळे साव झाले ।।१।।
वाहिलेल्या त्या फुलांचे ईशचरणी पुण्य झाले
भावनेचा हाट झाला मंदिरीया भक्तिचे भाव झाले २।।
भक्त झाले देव आता देवळाला देव मुकले
चालला हा व्यवहार इथे तरी त्यांचे नाव झाले ।।३।.
पीक नाही घेत कोणी बीज कणगीत पडले असे
बंगले सारेच येथे रानआता गाव झाले ।।४।।
सागर किनारी करित चिंता कुणाच्या भाकिताची
बन सुरूचे सुन्न होते त्यास चिंता काय झाले ।।५।।
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Sunday, September 27, 2009

हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

फूल होता त्या कळीचे मंद वारा वाहतो का
आणि फूल होते तेव्हा तो तिला टाळतो का?

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर