Sunday, May 9, 2010

का कोपली

का कोपली
ंमाणसांनी सर्व झाडे तोडता ती का कोपली?।
सावलीही रोपट्यावर सांजवेळी का कोपली ।।१।।
थेंब सारे पावसाचे पान आता साठवे का ।
ंद वारा येत तेव्हा माणसे ही का कोपली ।।२।।
थेंब वेडे झोंबता अन्‌ येत सारे चहुदिशांनी ।
पावसाच्य वागण्याने बाग सारी का कोपली ।।३।।
रीत भाती कोण जाणे लाज वाटे नात्यास या ।
वागणे हे सोयऱ्याचे जाणती का कोपली ।।४ ।।
सागराचे तीर तेव्हा येत पुन्हा भारूनी हे ।
आवसेच्या थंड रात्री चांदणी ही का कोपली ।।५।।
--------------------
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

पहाटे

पहाटे

ही नशा चढत जाते बघ निशेची या पहाटे ।
ंद उतरे रात्र उरलेल्या तमाची या पहाटे।।
उषःकाली पात्र सारे रिक्त होते वेदनांचे ।
अंबराला धुंद चढते प्रणयाची का पहाटे? ।।
सुचत ओळी मर्मभरल्या अर्थवाही सागराला ।
ऋतु जन्मे तो अचानक पूर्व दिशी हा पहाटे ।।
वेदनांना सलत जाते सुंदरीचे सुख कशाला ।
भावनांच्या क्रीडनांची जुगलबंदी बा पहाटे ।।
कशाला बोल लावू या सुखाला चांदराती ।
झुलत असे तेच स्वप्नी होउनी वारा पहाटे ।।
झोप येता या कळीला अलगद तिचे फूल होते ।
गंध पसरे भोवताला मदन मोहाचा पहाटे ।।

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, ताळगाव गोवा.