श्रावण आला
अंबरातले निळे झरे
उतरुनी भूमिवरी आले
रम्य मनोहर सजलेले
डोंगरातले नदी - नाले
काठवरच्या तरू लतांना
छेडित कशा या जलधारा
आला श्रावण श्रावण आला
संगे घेऊन सणांची माला
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर आणि कुटुंबीयांच्या साहित्याचा हा ब्लॉग आहे. येथे साहित्य वाचून प्रतिक्रिया व अभिप्राय नोंदवा