Thursday, March 13, 2008

प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितासंग्रहाचे सोमवारी प्रकाशन

पणजी, ता. 13, सांस्कृतिक प्रतिनिधी - दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाचे प्रकाशन गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे सोमवार 17 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मंडळाच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुरेश स. नाईक असतील. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. लेखक, समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी या काव्यसंग्रहावर भाष्य करतील. श्री. क्षीरसागर यांचा यापूर्वी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील विविध दैनिके, नियतकालिके व दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या तसेच गोमंतक मराठी अकादमीच्या स्पर्धेत त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळाले आहेत.

1 comment:

sanjayghugretkar said...

प्रिय मित्र...
सहकारी...
कविमित्र...
श्रीयुत प्रकाशचंद्र क्षीरसागर यांना.....
आपल्या "मातीचे डोहाळे' कवितासंग्रहाचे सोमवार 17 मार्च रोजी प्रकाशन होत आहे, ही एक आनंददायक बातमी आहे. आपल्या शुभउपक्रमास लाख लाख शुभेच्छा!

संजय घुग्रेटकर, माशेल - गोवा
ता. 15 मार्च 2008