आता तसे लिहाया
बसणेच होत नाही आता तसे लिहाया
सुचते तसेच सारे जमते कसे लिहाया?
काही कथा कुणाच्या रुचतात का मनाला?
मिळतात शब्द सारे सगळे असे लिहाया
दिसतो निसर्ग सारा साऱ्यांस भोवताली
शब्दांत सजवविणे जमणारसे लिहाया
हे विश्व चांदण्यांचे रात्रीत जागणारे
पुनवेस का कुणाला दिसणारसे लिहाया
सागर जरा किनारी लाटांस रोखतो पण
वाऱ्यास वेग येतो पकडू कसा लिहाया?
Sunday, December 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
छान आहेत कविता तुमछ्या . ही तर फारच छान निसर्ग शब्दांत उतरवणं कठिण आहे खरं पण आपण प्रयत्न कराय़चा ..
Post a Comment