Sunday, April 27, 2008

सौ. चित्रा क्षीरसागर यांच्या कविता

सासुरवासीण
लेक चालली सासरी
उभी राहे दारी
विवाहाचे तप झाले
दाटतेच उरी
डोळे पुसते का?
त्या विरहाच्या
यातानाऊरी
भावनांचा पूर
पाठवणी करताना
बाप घरामध्ये माझा
डोळे टिपतो लपून
कष्ट केले संसारात
जपतो अजून
खंतावते कधी पोर
दूर किती राहे
हात सदा पाठीवर फिराताहे

दिंड्या
पंढरीच्या वाटेवर
दिंड्या चालल्या कितिक
वारकरी भजनात
झाडे झेलतात दुःख
बाभळीची झाडे वेडी
सडा फुलांचा घालती
वाटे पिवळी धमक
पायघडी अंथरती
देण्या सावली भक्तांना
बाभळही पुढे सरे
गच्च पानांच्या फांद्यांत
कडुनिंब छत्री

-- सौ. चित्रा क्षीरसागर

2 comments:

Waman Parulekar said...

कोणत्याही फळाची आशा न करता झाडे आपली सेवा करतात आणि आपण मात्र निर्दयपणे झाडांची कत्तल करत् आहोत. कविता सुंदर आहे.

prakashkshirsagar said...

nehmee comments post kara