Saturday, April 25, 2020
गझल
कुणी कुणाला येथे पुस्तके ख्यालि खुशाली
अभिमानाने सांगत सुटते ख्यालि खुशाली
जाणून घ्यावे मर्म दिलाचे तगमग होता
मौन प्रियेचे लाजून वदते ख्यालि खुशाली
नजरेमध्ये भाव दाटले किती अनामिक
प्रेमाची ती कबुली कथते ख्यालि खुशाली
दु:खांदा या मिळते वाट मोकळी अश्रूंमध्ये
तिथेच त्याची सुखास कळते ख्यालि खुशाली
हात हलवुनि निरोप घेतो मी प्रेमाने
विरहाची मग तिथे स्फुंदते ख्यालि खुशाली
#. सागर प्रकाश
गझल
गझल
कुणी कुणाला येथे पुसते ख्यालि खुशाली
अभिमानाने सांगत सुटते ख्यालि खुशाली
जाणून घ्यावे मर्म दिलाचे तगमग होता
मौन प्रियेचे लाजून वदते ख्यालि खुशाली
नजरेमध्ये भाव दाटले किती अनामिक
प्रेमाची ती कबुली कथते ख्यालि खुशाली
दु:खांदा या मिळते वाट मोकळी अश्रूंमध्ये
तिथेच त्याची सुखास कळते ख्यालि खुशाली
हात हलवुनि निरोप घेतो मी प्रेमाने
विरहाची मग तिथे स्फुंदते ख्यालि खुशाली
#. सागर प्रकाश
Saturday, April 14, 2012
बोलबाला
लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5
Sunday, April 1, 2012
संवेदना
संवेदना मनाची झंकारते कशाला ?
औदार्य त्या क्षणाचे नाकारते कशाला?
माझ्या मनास तूही झेलून घेतलेले
मोक्यास ऐन वेळी तू टाळते कशाला?
कवटाळतो कुणी ही दुःखास बघ सुखाने
माझ्याच वेदनेला पण भाळते कशाला?
भरधाव जीवनाने विसरले प्रेम इथले
मग भावविश्व पुन्हा साकारते कशाला?
संकेत मीलनाचा देतो निसर्ग जेव्हा
मातीत पावसाने अंकूरते कशाला?
औदार्य त्या क्षणाचे नाकारते कशाला?
माझ्या मनास तूही झेलून घेतलेले
मोक्यास ऐन वेळी तू टाळते कशाला?
कवटाळतो कुणी ही दुःखास बघ सुखाने
माझ्याच वेदनेला पण भाळते कशाला?
भरधाव जीवनाने विसरले प्रेम इथले
मग भावविश्व पुन्हा साकारते कशाला?
संकेत मीलनाचा देतो निसर्ग जेव्हा
मातीत पावसाने अंकूरते कशाला?
Wednesday, March 28, 2012
BOLBALA
ऐकेल शेर माझा तो भारदस्त श्रोता
देईल दाद तोही माझाच मस्त श्रोता
----00-0-0-0--0-0--0--0-0-
रंगेल यौवनाचे नाते अधीर आहे
बांधील संयमाने त्याचेच जैत आहे
------0-0-0-0-0-0-0-0-00---
लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5
देईल दाद तोही माझाच मस्त श्रोता
----00-0-0-0--0-0--0--0-0-
रंगेल यौवनाचे नाते अधीर आहे
बांधील संयमाने त्याचेच जैत आहे
------0-0-0-0-0-0-0-0-00---
लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5
Friday, March 23, 2012
aaee
आईस पाहिले मी शेतात राबताना
आली सुगी सराई धानात राबताना
पडला मिरूग जेव्हा जोरात पेरणी ही
होतो भुईच आई रानात राबताना
पानात गीत जेव्हा पक्षी मधूर गाती
बांधावयास घरटी झाडात राबताना
पाटात वाहते पाणी साखर उसात भरली
बांधावरील बोरे पोरांत राबताना
आनंद साजरा हो येता वरात दारी
होईल हर्ष सागर लग्नात राबताना
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
आली सुगी सराई धानात राबताना
पडला मिरूग जेव्हा जोरात पेरणी ही
होतो भुईच आई रानात राबताना
पानात गीत जेव्हा पक्षी मधूर गाती
बांधावयास घरटी झाडात राबताना
पाटात वाहते पाणी साखर उसात भरली
बांधावरील बोरे पोरांत राबताना
आनंद साजरा हो येता वरात दारी
होईल हर्ष सागर लग्नात राबताना
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
Monday, July 18, 2011
Subscribe to:
Posts (Atom)
