Saturday, April 14, 2012

बोलबाला

लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5

Sunday, April 1, 2012

संवेदना

संवेदना मनाची झंकारते कशाला ?
औदार्य त्या क्षणाचे नाकारते कशाला?
माझ्या मनास तूही झेलून घेतलेले
मोक्‍यास ऐन वेळी तू टाळते कशाला?
कवटाळतो कुणी ही दुःखास बघ सुखाने
माझ्याच वेदनेला पण भाळते कशाला?
भरधाव जीवनाने विसरले प्रेम इथले
मग भावविश्‍व पुन्हा साकारते कशाला?
संकेत मीलनाचा देतो निसर्ग जेव्हा
मातीत पावसाने अंकूरते कशाला?

Wednesday, March 28, 2012

BOLBALA

ऐकेल शेर माझा तो भारदस्त श्रोता
देईल दाद तोही माझाच मस्त श्रोता
----00-0-0-0--0-0--0--0-0-
रंगेल यौवनाचे नाते अधीर आहे
बांधील संयमाने त्याचेच जैत आहे
------0-0-0-0-0-0-0-0-00---

लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5

Friday, March 23, 2012

aaee

आईस पाहिले मी शेतात राबताना
आली सुगी सराई धानात राबताना
पडला मिरूग जेव्हा जोरात पेरणी ही
होतो भुईच आई रानात राबताना
पानात गीत जेव्हा पक्षी मधूर गाती
बांधावयास घरटी झाडात राबताना
पाटात वाहते पाणी साखर उसात भरली
बांधावरील बोरे पोरांत राबताना
आनंद साजरा हो येता वरात दारी
होईल हर्ष सागर लग्नात राबताना
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Monday, July 18, 2011

prakashkshirsagar: नादान माणसेही

prakashkshirsagar: नादान माणसेही

नादान माणसेही

गावात श्‍वापदे ही राहावयास आली
का मानवा खुपावी झाडे बहरास आली?
घेतात ते सुपारी लोकांस मारण्याची
ही माणसे कुणाची जपण्या तयांस आली
विश्‍वास का नसावा अपुल्याच माणसांचा
हेरास नेमण्याची पाळी कशास आली
तारा अशा जुळाव्या गंधार छेडल्यावर
हुक्कीच अडण्याची साऱ्या सुरास आली
कुंडीत लावलेल्या रोपांस वाढ नाही
बागेतल्या कळीच्या जिवास आली
रमतो फुलांत सागर आता कशास येथे
गंधात परी कळीच्या गुंगी भुंग्यास आली

-----------------------------
घेऊन फूल आली मृत्यूस भेटण्याला
----------------------------------------
माझ्याच भोवताली सैतान माणसेही
देतात त्रास सर्वां नादान माणसेही
नसतो कुणास येथे कसलाच धाक आता
जाणून सर्व काही बेभान माणसेही
फुगतो नवीन रस्ता बेताल वाहनांनी
धुंदीत धावताना बेजान माणसेही
नाकासमोर माझे हे चालणे असूनी
छळतात का मला मग बैमान माणसेही
वागणे तुझे मनस्वी कळणार काय सागर
होती मुजोर सारी अज्ञान माणसेही
--------------- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, ताळगाव, गोवा

Sunday, December 19, 2010

आता तसे लिहाया

आता तसे लिहाया
बसणेच होत नाही आता तसे लिहाया
सुचते तसेच सारे जमते कसे लिहाया?
काही कथा कुणाच्या रुचतात का मनाला?
मिळतात शब्द सारे सगळे असे लिहाया
दिसतो निसर्ग सारा साऱ्यांस भोवताली
शब्दांत सजवविणे जमणारसे लिहाया
हे विश्‍व चांदण्यांचे रात्रीत जागणारे
पुनवेस का कुणाला दिसणारसे लिहाया
सागर जरा किनारी लाटांस रोखतो पण
वाऱ्यास वेग येतो पकडू कसा लिहाया?